Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
सोलापुरात’लॉकडाऊन’ मध्ये यात्रा साजरी करण्याचा प्रयत्न, पोलिसांवर दगडफेक, गुन्हा दाखल

सोलापूर : वागदरीत गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे ही घटना घडली आहे. येथे एक यात्रा असते, मात्र लॉकडाऊन असल्याकारणाने पोलिसांनी यात्रेला परवानगी दिली नाही. दोन लोकांनीच पुजा करावी असा पोलिसांचा आग्रह होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. मात्र, वागदरी येथे जमावबंदीचा आदेश मोडून यात्रा साजरा करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केल्यावर गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर यात्रा कमिटीचे पंच आणि 200 हून अधिक ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.




