Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यात 24 तासांमध्ये वाढले 9251 रुग्ण, तर 7 हजार 227 रूग्णांना डिस्चार्ज
मुंबई: राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी 9251 रुग्णांची वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या 8 ते 10 हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर आज 257 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 366368 एवढी झालेली आहे. तर 13389 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे.
मुंबईत 1080 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या 108060 एवढी झाली आहे. तर आज 7 हजार 227 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. राज्यात आत्तापर्यंत 2 लाख 7 हजार 194 जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 55.56 एवढं झालं आहे.





