राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभागाच्या वतीने पोलिसांना शक्तीवर्धक काढा आणि गोळ्यांचे वाटप

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविला अनोख उपक्रम
- जिल्हाध्यक्षा मीना मोहिते यांच्या हस्ते कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मान
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी विविध उपक्रम राबविले. राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा मिना मोहिते यांनी या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून कोविड 19 काळात आपल्या प्राणाची बाजी लावणा-या कर्तबगार पोलीस कर्मचा-यांना कोरोना योध्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच, त्यांना शक्तीवर्धन काढा ही देण्यात आला.
गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचा पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अक्षरषः कहर सुरू आहे. या कोरोनासोबत जीवन जगणे नको-नकोशे झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांसाठी प्राणाची बाजी लावून सेवा करणा-या पोलीस अधिकारी तसेच कर्मचा-यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस असंघटीत कामगार विभागाच्या अध्यक्षा मीना मोहिते यांनी दखल घेतली आहे. गेल्या चार महिन्यांपासून मीना मोहिते पक्षातर्फे पोलिसांना शक्य तेवढे सहकार्य करत आहेत. त्यामुळे पोलिसांनाही आपली दखल घेणारे कोणीतरी आहे, याची जाणीव होऊ लागली आहे.
सध्या संपूर्ण शहरात कोरोनाची आपत्ती आहे. प्रत्येक नागरिकाला तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहोरात्र पहारा देणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेची दखल घेऊन मीना मोहिते यांनी त्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मान दिला आहे. संघटनेच्या वतीने मोशी टोलनाक्यावर पोलिसांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे. पोलिस कर्मचा-यांचा असंख्य नागरिकांशी संपर्क येतो. कोरोनाबाधीत व्यक्तीशी संपर्क येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना शक्तीवर्धक काढा देण्यात आला. शक्तीवर्धक गोळ्याही वाटप करण्यात आल्या
यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष नितीन गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्षा जयश्री प्रसाद, पुणे जिल्हा सचिव गायत्री असवले, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सलीम अत्तार, कायदे सल्लागार पंजाबराव इंगळे, समाजसेवक अरुण अवधूत, भूषण शिरसाठ, राजेंद्र मोहिते, प्रभाग अध्यक्ष मोहसिन हुसेन मुलाणी, दर्शना महाजन, सामाजिक कार्यकर्ते शरीफ मालदार आदी यावेळी उपस्थित होते.




