Breaking-newsताज्या घडामोडी
गडचिरोलीत 71 एसआरपीएफ जवान कोरोना पॉझिटिव्ह

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विलगीकरणात ठेवलेल्या 71 एसआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. विलगीकरणात असलेल्या या जवानांचे अहवाल आले असून 71 जवाना कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 424 कोरोनाबाधितांमध्ये 286 जवानांचा समावेश आहे. जिल्ह्यात आणखी 71 कोरोनाबाधित जवान आढळल्याने जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 250 झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 424 झाली आहे. आतापर्यंत 173 रूग्ण बरे झाले असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.





