Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: धक्कादायक! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मुलाच्या सुरक्षा रक्षकांनाच कोरोनाची लागण

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. हे दोन्ही सुरक्षा रक्षक आठवडाभरापूर्वी तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात होते. तेजस ठाकरेंचे यांची प्रकृती चांगली आहे. या सुरक्षा रक्षकांवर आता उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची काही लक्षणं आढळल्याने त्यांची टेस्ट करण्यात आलेली होती.

ती पॉझिटिव्ह आल्याने त्या दोघांवरही उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचीही माहिती दिली जात आहे. या आधीही मातोश्रीच्या परिसरात कोरोनाची लागण काही पोलिसांना झाली होती. तर खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून स्वत:च गाडी चालवत आपलं काम करत असून त्यांनी ड्रायव्हरला देखील रजा दिलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button