Breaking-newsमहाराष्ट्र
राज्यात हाॅटेल्स आणि लाॅज लवकरचं सुरू करण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात मिशन बिगिन अगेन आणि अनलाॅक होत असताना अनेक उद्योग सुरू करण्यात आले आहेत. आता लवकरचं हाॅटेल्स सुरू करण्याविषयी सरकार विचाराधीन आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हाॅटेल उद्योग परत कसा सुरु करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.





