Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाच्या काळातही आमदार लांडगे सोसायटीधारकांच्या हक्कांसाठी ‘सतर्क’!

चिखली- मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशच्या प्रतिनिधींशी चर्चा

बिल्डरांकडून होणारी पिळवणूक, पायाभूत सुविधांसाठी अधिकाऱ्यांना सूचना

पिंपरी । प्रतिनिधी
सोसायटीधारक आणि सदनिकाधारकांची बिल्डरांकडून होणारी पिळवणूक आणि महापालिका प्रशासनाकडून मिळणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा याबाबतच्या तक्रारी तात्काळ निकालात काढल्या पाहिजेत, अशा सूचना आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून सोसायटीधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी आमदार महेश लांडगे ‘सतर्क’ असलेले दिसत आहेत. शनिवारी चऱ्होली प्राईड वर्ल्ड सिटीमधील सोसायटी व गंधर्व एक्सलन्स, मोशी येथील सोसायटीधारकांशी आमदार लांडगे यांची बैठक झाली. यावेळी चिखली-मोशी-चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशन यांच्या वतीने प्रलंबित विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी रहिवाशी, सोसायटींचे प्रतिनिधी, विकसक प्रतिनिधी आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.

सध्या अनेक नोकरदार नागरिकांचे ‘वर्क फॉर्म होम’ सुरू आहे. मात्र, प्राईड वर्ल्ड, चऱ्होली भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नोकरदार नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर महावितरणच्या देखभाल दुरुस्तीची कामे महिन्यातून एकवेळा नियमित करण्याबाबत आमदार लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच, वीज उपकेंद्रासाठी संबंधित विकसकांनी जागा उपलब्ध करुन द्यावी. त्यावर महावितरण प्रशासनाच्या माध्यमातून १३/ ११ केव्ही वीज उपकेंद्र कार्यान्वयीत करण्यात येईल. यासह रहिवाशी भागांमध्ये व्यावसायिक मीटर न देता रहिवाशी मीटर उपलब्ध करण्याबाबत मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे, प्रति सदनिकाधारकाला गरजेप्रमाणे पाणी उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी सामाहिक टाकी न उभारता. प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र टाकी बांधून पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, अशा सूचनाही आमदार लांडगे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

यावेळी माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, नगरसेवक वसंत बोऱ्हाडे, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, महावितरण कार्यकारी अभियंता श्री. गवारी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. भरणे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

‘गंधर्व एक्सलन्स’ मधील अडचणींवर तोडगा…

गंधर्व एक्सलन्स सोसायटीमधील रहिवाशी आणि विकसक तसेच स्थानिक रहिवाशी यांच्यामध्ये अनेक समज-गैरसमज होते. आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने सोसायटीमधील सर्व अडचणींवर तोडगा काढण्यात आला. मैलाशुद्धीकरण केंद्र, पेव्हींग ब्लॉक, पार्किंग समस्या, कन्वीन्स डीड, पाणी समस्या आदींवर चर्चा करुन मार्ग काढण्यता आला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button