Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: 👍मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अश्विनी भिडे म्हणतात…

मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे. जयश्री बोस यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांनी शनिवारी स्वीकारला. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी संधी दिल्याबद्दल त्यांनी पालिकेचेही आभार मानले आहेत. तसंच करोनाच्या लढ्यासाठी आम्ही सज्ज असल्याचंही त्या म्हणाल्या.





