आव्हाड म्हणाले,तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या

आव्हाड म्हणाले,तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना व्हायरसवर यशस्वी मात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता ठणठणीत असून ते सध्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आव्हाड यांना प्रथम ज्युपिटर रुग्णालयात आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

अखेर त्यांना गुरूवारी (7 मे) डिस्चार्ज देण्यात आला. आपला नेता ठणठणीत बरा झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, समर्थकांनी समाधान व्यक्त केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांसाठी खास ट्वीट केलं आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1259352136091144193

‘डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही. त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये, अशी विनंती आव्हाड यांनी आपल्या हितचिंतकांना, कार्यकर्त्यांना केली आहे. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *