#CoronaVirus: सोलापुरात एकाच दिवशी २९ कोरोनाबाधित रूग्णांची भर

#CoronaVirus: सोलापुरात एकाच दिवशी २९ कोरोनाबाधित रूग्णांची भर

सोलापुरात करोनाचे भय वाढतच असून आज गुरूवारी एकाच दिवशी २९ नवे रूग्ण आढळून आले. तसेच एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबाधित रूग्णसंख्या १८२ वर पोहोचली आहे. यात ११ मृतांचा समावेश आहे. रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे सार्वत्रिक चिंताही वाढली आहे. आज नव्यानं आढळून आलेल्या २९ रूग्णांमध्ये १५ महिलांचा समावेश आहे. अद्यापि २८० रूग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *