Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

नोकियाला एअरटेलने दिले 5 जी नेटवर्क तयार करण्यासाठी 7500 कोटी रुपयांचे कंत्राट

दूरसंचार उपकरणे बनवणारी प्रमुख कंपनी नोकियाला भारती एअरटेलने 5जी नेटवर्क तयार करण्यासाठी ७५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. त्या अंतर्गत कंपनी देशातील ९ दूरसंचार सर्कलमध्ये नेटवर्क तयार करणार आहे . भारती एअरटेलने ही माहिती दिली आहे. या कराराअंतर्गत नोकिया 4 जी सेवांसाठी तीन लाख बेस स्टेशन तयार करणार आहे. जी पुढच्या पिढीच्या सेवांसाठी स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर 5जी नेटवर्कमध्ये अपग्रेड केली जाणारे. 

भारती एअरटेलने नेटवर्क क्षमता आणि ग्राहकांच्या सुविधेसाठी हा करार केला आहे. एअरटेलने या ९ दूरसंचार सर्कलमध्ये नोकियाच्या सिंगल रेडिओ एक्सेस नेटवर्क (एसआरएएन) तंत्रज्ञानासाठी काही वर्षांचा समझोता करण्याची घोषणा केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कराराचे मूल्य सुमारे ७५०० कोटी रुपये आहे. 

एअरटेलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या अंतर्गत एअरटेलकडून या ९ सर्कलमध्ये सुमारे ३ लाख रेडिओ नेटवर्क उपकरण लावले जातील. हा या वर्षीचा पहिला नेटवर्क विस्तार करार असेल. विशेष म्हणजे लॉकडाऊनदरम्यान वेगवान डाटाच्या मागणीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group