#CoronaVirus | 3 दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड होते कोरोना पॉझिटिव्ह

#CoronaVirus | 3 दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड होते कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोना झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या, पण माझी टेस्ट निगेटिव्ह आल्याचं त्यांनी स्वत: माध्यमांना स्पष्ट केलं. या सगळ्या गोंधळात आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. जितेंद्र आव्हाड करोना पॉझिटिव्ह होते असा गंभीर खुलासा ठाणे मनपा राष्ट्रवादी नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे.

‘तीन दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांचे करोना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले होते. पण तीन दिवसांत उपचार करून त्यांची दोन चाचण्या अवघ्या तीन दिवसांमध्ये निगेटिव्ह आल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व 7 ते 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जितेंद्र आव्हाड हे आता क्वारंटाईनमध्ये आहेत. आव्हाडांच्या व्हिडिओनंतर जनतेसमोर येण्याचं कारण म्हणजे, ते म्हणाले की, मी जनतेला जी रोज मदत करत आहे. ती करू शकत नाहीये. याची आम्हालाही खंत आहे.’ असं मिलिंद पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *