Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी
टाटा मोटर्स गाड्यांची ऑनलाइन बुकिंग सुरू

नवी दिल्ली | भारतात करोना व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर देशभरात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी विक्री सोडली तर जवळपास सर्वच व्यवहार सध्या बंद आहेत. करोनाचा फटका देशातील सर्वच उद्योगांना बसला आहे.
ऑटो क्षेत्र याआधीपासून संकटाचा सामना करीत होते. परंतु, करोना व्हायरसमुळे त्याला जास्ती फटका सहन करावा लागत आहे. १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असले तरी त्यावर ऑटो कंपन्यांनी एक मार्ग शोधून काढला आहे. त्यानंतर आता टाटा मोटर्सनेही आपली ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. या काळात टाटा मोटर्सच्या गाड्या ऑनलाइन खरेदी करता येवू शकणार आहेत.





