फाशी दिल्यानंतर दिल्यानंतर जेव्हा बेशुद्ध पडला जल्लाद

फाशी दिल्यानंतर दिल्यानंतर जेव्हा बेशुद्ध पडला जल्लाद

दिल्लीत २०१२ मध्ये संपूर्ण देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणारी घटना घडली. आज सकाळी ठीक साडेपाच वाजता निर्भया प्रकरणातील सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्यात आली. तिहार तुरूंगात चौघांना फाशीवर लटकवण्यात आलं. ही फाशी दिली ती म्हणजे जल्लाद पवन यानं. फाशी देताना जल्लादलादेखील आपलं मन कठोर करण्याची गरज असते. आज असे निवडकच लोकं असतील ज्यांना २००४ मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलेल्या धनंजय चटर्जी प्रकरणाची आठवण असेल. त्याला फाशी दिल्यानंतर जल्लाद त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला होता.

१४ ऑगस्टला झालेली फाशी
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी धनंजय चटर्जीला १४ ऑगस्ट २००४ रोजी सकाळी ४.३० वाजता फाशी देण्यात आली होती. ज्या दिवशी त्याला फाशी देण्यात आली त्याच दिवशी त्याचा ३९ वा वाढदिवस होता. फाशीच्या अखेरच्या क्षणापर्यंत आपण निर्दोष असल्याचंही तो सांगत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *