Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अफवा पसरविणा-या दोघांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील काही प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण असल्याची खोटी माहिती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोटी अफवा पसरवल्या प्रकरणी पहिला गुन्हा पुण्यात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी खुद्द पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर (वय 59) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलमध्ये कोरोना रुग्ण आहेत. तर काही ठिकाणच्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोना झाला आहे. तसेच काही परदेशातील नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. याबाबत खात्री केली असता असा कुठलाच प्रकार समोर आला नाही. त्यावेळी ही अफवा असल्याचे समोर आले. त्यांनतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. भारतात थैमान घालणाऱ्या रोगाबाबत अफवा पसवरल्याप्रकरणी पुण्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button