Breaking-news

क्रीडा विभागातील ढिसाळ कारभाराची चौकशी करा

कोल्हापूर | महाईन्यूज

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान झाले. संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई क रावी, अशी मागणी करीत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने गुरुवारी मुख्य इमारतीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये याबाबत सदस्यांनी आवाज उठवावा, या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. कृती समितीच्या वतीने ‘संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा’, ‘झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण?’, ‘खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे,’ असे फलक हातांमध्ये घेऊन जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button