Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘करोना व्हायरस’ दुबईमार्गे पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल, त्या संशयीत पाचपैकी तिघांना करोनाचा संसर्ग

Share On

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात काल बुधवारी (दि. 11) करोनाचे पाच संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील तिनजणांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. घाबरण्याचे काहीही कारण नसून त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन विभागात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाचे पाच संशयीत रुग्ण असून त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत आयुक्त हर्डीकर यांनी दिली होती . त्या पाच रुग्णांच्या घशाचे नमुने परिक्षण करण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून पाचपैकी तिनजणांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात आयसोलेशन विभागामध्ये उपचार सुरू केले आहेत, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

दुबई येथून शहरात परतल्यानंतर त्या पाच संशयीतांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील तिनजण पॉझिटिव्ह असून ते किवळे आणि ताथवडे भागातील राहत असल्याची माहिती आहे. अन्य दोनजणांना करोनाचा कसलाही संसर्ग झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे त्यांना तपासणी झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button