Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘शरद पवारांनी बाप बदलला नाही, ते स्वत: बाप झाले’; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला

मुंबई | महाईन्यूज

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या आजी-माजी नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपा नेते गणेश नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बाप बदलणारी औलाद नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्यावर जहरी टीका केली होती. जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं होतं. पक्षांतर करणाऱ्या शरद पवारांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का, असा सवाल गणेश नाईक यांनी आव्हाड यांना विचारला होता. मात्र आता पुन्हा गणेश नाईक यांनी उपस्थित केलेल्या सवालावर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, शरद पवार यांनी बाप बदलला नसून ते स्वत: बाप झाले. शरद पवार यांचा इतिहास गणेश नाईक यांना कितपत माहिती आहे याची मला कल्पना नाही. परंतु गणेश नाईक किती कृतघ्न आहेत हे त्यांनी त्यांच्या विधानातून दाखवून दिलं आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच बाप काढल्याचं वक्तव्य तुम्ही केलं. मी बाप काढला नाही. कुठल्यातरी फडतूस पिक्चरचा फडतूस डायलॉग बोलून तुम्ही बाप काढलात. तेव्हा मी खाली घसरलो की तुम्ही खाली घसरलात? हे जरा आठवून बघा असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

https://twitter.com/AwhadOffice/status/1237706453839794176
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button