Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात स्वाइन फ्लूचे 9 रुग्ण आढळल्यानं खळबळ

Share On

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी

पुण्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा 45 दिवसांमध्ये स्वाइन फ्लूच्या 9 रुग्णांचं निदान झालं आहे. त्यापैकी दोघांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

N1H1 या संसर्गजन्य विषाणूंचं 8 जणांना निदान झालं आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 45 दिवसांमध्ये आरोग्य विभागातर्फे 1 लाख 35 हजार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्यापैकी एक हजार 103 रुग्णांना लसीकरण देण्यात आलं आहे. त्यापैकी दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 2009 साली स्वाइन फ्लूने राज्यात मोठ्या प्रमाणात हाहाकार पसरवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा स्वाइन फ्लू डोकं वर काढू पाहात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button