केजरीवालांच्या शपथविधीला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही

केजरीवालांच्या शपथविधीला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही

नवी दिल्ली | महाईन्यूज

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं जाणार नाहीये. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात येणार असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे. आपचे नेते गोपाळ राय यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच ‘दिल्लीकरांनो… तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी जरूर या’ असं निमंत्रण अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्य दिल्लीकरांना ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून केलेलं आहे.

‘जेव्हा भारतमातेच्या प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल, जेव्हा भारताच्या प्रत्येक नागरिकाला चांगले उपचार मिळतील, सुरक्षा व सन्मान महिलांमध्ये आत्मसन्मान निर्माण करेल, युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी त्यांच्या घामाचे मूल्य मिळेल, प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा मिळतील, धर्म, जात सोडून प्रत्येक भारतवासी भारताला पुढे घेऊन जाईल तेव्हाच अमर तिरंगा आकाशात अभिमानाने फडकेल, तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी रामलीला मैदानावर सकाळी सहा वाजेपर्यंत जरुर या’ असं निमंत्रण केजरीवालांनी व्हिडीओतून दिलं आहे.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/1227899486963265537

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *