लष्कर ए तोयबाचा दहशतवादी अटकेत

लष्कर ए तोयबाचा दहशतवादी अटकेत

जम्मू-काश्मीर | महाईन्यूज

जम्मू-काश्मीर पोलिसांना दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले आहे. बारामुल्ला भागात १९ वर्षीय शाजिद फारुख डार या दहशतवाद्यास पकडण्यात आले आहे. या अगोदर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस जवानांनी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या कारी यासीरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. भारतीय जवानांचे हे देखील मोठे यश होते. या कारवाईत ठार करण्यात आलेला यासीर हा मागील वर्षी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी झालेला होता. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता.

https://twitter.com/ANI/status/1221962027981164544

याशिवाय, जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात सुरक्षा दलांशी चकमकीत मारला गेलेला दहशतवादी हा जैश ए महंमदचा सदस्य व पाकिस्तानी नागरिक होता, तसेच तो अनेक गुन्ह्य़ात पोलिसांना हवा होता, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *