Breaking-news

तहसीलदार सावनेर यांच्यावर रेतीने भरलेला ट्रक चढविण्याचा प्रयत्न

नागपूर | महाईन्यूज

रेतीची वाहतूक करून जाणाऱ्या ट्रकला तहसीलदाराने थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रक ने त्यांनाच उडवण्याचा प्रयत्न करून ट्रक चालक व क्लीनर ट्रक घेऊन पसार झाले आहेत. तहसीलदार व त्यांच्या टीम ने ट्रक चा तब्बल 25 किलोमीटर पाठलाग केला. दरम्यान एकदा ट्रक थांबवण्यासाठी तहसीलदार यांच्या गाडी चालकाने ट्रकच्या समोर गाडी आडवी करून ट्रक थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र ट्रक चालकाने तेव्हा तहसीदाराची गाडीही उडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शेवटी ट्रक चालक व क्लीनरला ट्रक घेऊन पसार होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गाडी गावात शिरवून रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून पसार झाले आहेत. हो घटना शुक्रवारी सकाळी 5 वाजता घडलेली आहे.

सावणेरचे तहसीलदार दीपक करंडे यांच्या सोबत लिपिक जयसिंग राठोड , सुजित आडे , गणेश मोरे हे कर्मचारी जिल्हाधिकारी नागपूर यांच्या आदेशान्वये रेती चोरीवर आळा घालण्यासाठी रात्री गस्तीवर होते. पहाटे 5 वाजता मध्यप्रदेश मार्गावरील हायवे रस्त्याने नांदा गोमुख मार्गे काटोल कडे जाण्याच्या तयारीत असलेला ट्रक क्रमांक एम एच 40 बी एल 0254 क्रमांकाचा रेतीचा ओव्हरलोड ट्रक भरगाव वेगाने जाताना दिसला होता. खुद्द तहसीलदार यांनी नांदा गोमुख जवळ ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रक चालकाने ट्रक चा अधिक वेग करत तहसीलदार यांच्या वर चढवण्याचा प्रयत्न करत जवळून ट्रक नेत पसार झालेले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button