ठाकरे आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते-गुलाबराव पाटील

ठाकरे आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते-गुलाबराव पाटील

मुंबई | महाईन्यूज

ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झालेला आहे. राज ठाकरे यांचे आडनाव ठाकरे नसते, तर ते संगीतकार म्हणून दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेना नेते आणि राज्याचे नवनियुक्त पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे. नाशिकमधील पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी गुलाबराव पाटील बोलत होते त्यावेळी त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

‘राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते आहे. मनसे नावाची पार्टी राहिलीच कुठे आहे? ही तुमच्याकडे दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाहीये. ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. यांचे सरनेम, यांच्या नेत्याचे नाव जर ठाकरे नसते, तर कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते व त्यामुळे ठाकरे आडनावाचे वलय त्यांच्याकडे दिसत आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *