वाहनाच्या धडकेत शिरूरमध्ये बिबट्याचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत शिरूरमध्ये बिबट्याचा मृत्यू

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथे पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारस घडली.

सदरील घटनेची माहिती मिळतात शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वनविभागाचे अधिकारी व स्थानिक तरुणांच्या मदतीने मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी तातडीने नेले. वनविभागाने शव विच्छेदनानंतर बिबट्यावर अंतिम संस्कार केले. गेल्या काही दिवसांत बिबट्यांचा रस्ते अपघातात मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मानव वस्तीकडे बिबट्याचा वाढत चाललेला वावर याकडे वन विभागाने ठोस उपाय योजना करने गरजेचे आहे. असे अधिकारी सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *