Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
संजय राऊत यांचे ट्विट, भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई | शिवसेनेकडून पुन्हा एकदा भाजप आणि मोदी सरकावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एक नवीन ट्विट केले आहे. हे ट्विट सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणार आहे. त्यांनी पुन्हा एकादा भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना-भाजप युती तुटण्याआधीही त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर त्यांचा भाजपवर हा हल्लाबोल सुरुच आहे. सध्या देशात NRC आणि CAA वरुन आंदोलन सुरु आहेत. काही ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे. त्याचवेळी भाजपकडून समर्थनार्थ मोर्चेही काढण्यात येत आहे. या राजकीय स्थितीवरुन त्यांनी हे ट्विट केले आहे.





