Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अखेर ठरलं! शरद पवारांची आणखी एक ‘महामुलाखत’, संजय राऊतांची प्रश्नावली

Share On

महाईन्यूज | मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची आणखी एक लक्षणीय मुलाखत घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मुलाखत शिवसेनेचे ‘सामना’वीर नेते आणि खासदार संजय राऊत घेणार आहेत. व याही मुलाखतीचे ठिकाण पुणे हेच असणार आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवार यांची मुलाखत घेतलेली होती. शरद पवारांची ही ‘राज’कीय मुलाखत प्रचंड गाजली होती. राष्ट्रीय पातळीवर या मुलाखतीची चर्चाही झाली. त्यानंतर, पवार यांचा राऊत यांच्याशी सामना नक्कीच पाहायला मिळणार आहे.

पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित एका कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज यांच्या प्रश्नांना पवारांनी मनसोक्त उत्तरे दिली. शरद पवार यांची मुलाखत घेताना राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवरील अनेक प्रश्नांची विचारणा केली. यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत दिली आहे. दरम्यान, या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे यांनी रॅपिड फायर राऊंड घेत काही झटपट प्रश्नही शरद पवारांना विचारले. या रॅपिड फायर राऊंडमधील शेवटचा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला असता त्या प्रश्नाचे शरद पवार यांच्याकडून उत्तर ऐकण्यास स्वत: राज ठाकरे यांच्यासह उपस्थितांना उत्सुकता लागली होती. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवारांना विचारलं की, ‘राज की उद्धव?’, यावर शरद पवारांनी आपल्याच शैलीत उत्तर दिले होते…. ठाकरे कुटुंबीय !. कदाचित पवारांच्या या उत्तरामुळेच आज राष्ट्रवादी आणि शिवसेना आज एकत्र दिसतंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button