Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

माहिम: किनारी सापडलेल्या बॅगेतील मानवी अवशेषांचे गूढ उकलले

Share On

महाईन्यूज | मुंबई

माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या मानवी अवशेषांचे गूढ पोलिसांनी उलगडले. लैंगिक अत्याचाराला कंटाळून १९ वर्षीय तरुणीने अल्पवयीन प्रियकरासह हत्या केल्याची माहिती या प्रकरणाच्या तपासातून पुढे आली आहे.माहिम समुद्रकिनाऱ्यावर २ डिसेंबर रोजी संध्याकाळी वाहून आलेल्या बॅगमध्ये मानवी अवशेष सापडले होते. हे अवशेष बेनेट रिबेलो (५९) या कलावंताचे असल्याचे उघडकीस आले आहे. बेनेट यांची हत्या २६ नोव्हेंबरला सांताक्रूझ येथील राहत्या घरीच करण्यात आली होती.

बांबू आणि चाकूने वार करूनही बेनेट यांचा मृत्यू होत नाही म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर डास मारण्याचे औषध फवारण्यात आले होते. त्यानंतर तीन दिवस बेनेट यांचा मृतदेह घरातच होता. दोन्ही आरोपींनी याच घरात वास्तव्य केले. बेनेट यांच्या शरीराच्या अवयवांसोबत त्यांचे काही कपडे सुटकेसमध्ये होते. त्यातील शर्टवरील स्टिकरवरून पोलिसांनी कुर्ला येथील एका टेलरला शोधले. त्यानेच हा शर्ट शिवला होता. त्याच्याकडील नोंदी आणि समाज माध्यमांवरील अस्तित्वावरून हे अवशेष बेनेट यांचेच असल्याचे उघड झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button