Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धक्कादायक! ६७ वर्षीय जेष्ठाकडून पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Share On

महाईन्यूज | पिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे अमिश दाखवून ६७ वर्षीय जेष्ठ नागरिकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पीडित चिमुकलीच्या आजी ने फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊराव उर्फ आप्पा बळीराम खरात वय-६७ असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी जेष्ठ नागरिकाचे नाव आहे व त्याला पिंपरी पोलिसांनी अटक केलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीच च्या सुमारास नेहरू नगर येथे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आरोपी भाऊराव उर्फ आप्पा बळीराम खरात वय-६७ वर्ष यांचं घरातच किराणा दुकान आहे व तिथेच पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेट चे अमिश दाखवून तिच्याबरोबर लैंगिक चाळे केले. यावेळी आरोपी च्या घरात कोणी नव्हते अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिलेली आहे. दरम्यान, पाच वर्षीय चिमुकलीने काही तासांनी घाई घटना आजी पाशी बोलून दाखवली, त्यामुळे ही गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी आरोपी भाऊराव याला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख या करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button