Breaking-newsक्रिडा

‘सुपर-किक’… जुव्हेंटसच्या पावलोने केला अफलातून गोल(Video)

जुव्हेंटसचा संघ म्हटलं की सगळ्यांचं लक्ष असतं ते स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टीआनो रोनाल्डो याच्याकडे.. त्याने आजपर्यंत अनेक सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या खेळीच्या बळावर अनेकदा त्याच्या संघाने विजय मिळवून दिला आहे. मात्र मंगळवारी UEFA Champions League स्पर्धेच्या साखळी फेरीच्या सामन्यात एका वेगळ्याच खेळाडूने लक्ष वेधून घेतले. तो खेळाडू म्हणजे पावलो डिबाला…

पावलो डिबाला याने अनेकदा फ्रि-किकवर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवली आहेत. त्यातच नुकत्याच अटलेटिको माद्रीद या संघाविरूद्ध झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात पावलो डिबाला याने आपल्या संघाला धमाकेदार गोल करत आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सामन्याच्या उत्तरार्धात दोनही संघ गोलशून्य बरोबरीत होते. त्यावेळी पावलो डिबालाने अतिशय अशक्यप्राय वाटणारा असा गोल करत सामन्यात जुव्हेंटसला आघाडी मिळवून दिली.

https://twitter.com/sergidemo/status/1199433211790725130
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button