Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रिडाविषयक स्थापत्य कामासाठी क्रिडा समितीची परवानगी घ्यावी

Share On
  • सभापती तुषार हिंगे यांची आयुक्तांना सूचना

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

क्रीडा विभागाच्या अंतर्गत स्थापत्य विषयक कामे करताना क्रीडा समितीची प्रशासकीय मान्यता घेण्यात यावी, अशी मागणी क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी केली आहे.

यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, मनपा क्रीडा विभागाच्या अंतर्गत विविध स्थापत्य विषयक कामे करण्यात येतात. त्यामध्ये विविध मैदाने जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल इत्यादी कामे केली जातात. पण, त्यामध्ये स्थापत्य विभाग व क्रीडा विभाग यांच्या अयोग्य समन्वयाअभावी योग्य त्या क्रीडा सुविधा योग्य त्या ठिकाणी पोहचत नाहीत.

त्यामुळे लोकांतून नाराजी व्यक्त होते. तरी, यापुढे कोणातीही क्रीडा सुविधा विकसीत करताना संबधित सुविधा योग्य त्या ठिकाणी य संबंधित योग्य अश्या व्यक्तिंशी समन्वय साधून क्रीडा समितीची प्रशासकीय मान्यता घ्यावी. क्रिडा समितीच्या मान्यतेअभावी कोणतेही स्थापत्य विषयक काम करण्यात येऊ नये, अशी सूचना सभापती हिंगे यांनी आयुक्तांना निवेदनातून केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button