वेब सिरीजमध्ये हॉट सीन्सचा भडीमार का? एकता कपूरनं दिलं बिनधास्त उत्तर

वेब सिरीजमध्ये हॉट सीन्सचा भडीमार का? एकता कपूरनं दिलं बिनधास्त उत्तर

छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रचंड यश मिळवल्यानंतर आता एकता कपूरने आपले लक्ष डिजीटल प्लॅटफॉर्मच्या दिशेने वळवले आहे. तिने ‘अल्ट बालाजी’ नामक एक वेब सिरीज अ‍ॅप देखील सुरु केले आहे. या अ‍ॅपला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. परंतु यावर दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमध्ये अश्लिल सामग्री खुप मोठ्या प्रमाणावर असते, अशी टीका वारंवार केली जाते. एकता कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या टीकेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाली एकता कपूर?

“आम्ही प्रेक्षकांचा विचार करुनच वेब सिरीजची निर्मिती करतो. आम्ही केलेल्या संशोधनानुसार भारतातील प्रेक्षकांना इंटिमेट सीन असलेल्या मालिका पाहायला खुप आवडते. या आधी आम्ही अल्ट बालाजी अ‍ॅपवर ‘मॉम’ आणि ‘द वर्डिक्ट’ यांसारख्या मालिका देखील सुरु केल्या होत्या. परंतु यांना प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. मी जेथे जाते तिथे लोक मला ‘गंदी बात’ या सिरीजबाबत प्रश्न विचारतात. त्यावेळी लोकांची ‘द वर्डिक्ट’ सारख्या सिरीजवर बोलण्याची इच्छा देखील नसते. त्यामुळे आम्ही अल्ट बालाजीवरील वेब सिरीजमध्ये इंटिमेट सीनचा वापर जास्त करतो. असे स्पष्टिकरण एकता कपूरने दिले.

सध्या एकता कपूरच्या गंदी बात या वेब सिरीजची सोशल मीडियावर चर्चा आहे. गंदी बातचा चौथ्या सिजनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *