Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे- सोलापूर मार्गावर भीषण अपघात; पती ठार तर पत्नी, मुलगा थोडक्यात बचावले

दौंड:- पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी गावाजवळ भीषण अपघात झाला असून यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अनिल मुलीया (रा. वडगाव शेरी, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अनिल मुलीया यांची पत्नी आणि मुलगा या अपघातात थोडक्यात बचावले आहे.
पुणे सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील खडकी गावाजवळ काळभोर वस्ती याठिकाणी आयशर आणि स्वीफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. रविवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आयशर गाडीवर स्विफ्ट कार मागच्या बाजुने आदळली. स्विफ्टमधील ड्रायव्हर शेजारी बसलेले अनिल मुलीया यांचा जागेवरच मृत्यू झाला. ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. अनिल मुलीया यांची पत्नी आणि लहान मुलगा सुखरूप आहे. अनिल मुलीया हे आपल्या कुटुंबीयांसोबत हैदराबादहून पुण्याला येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.





