Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शरद पवारांकडून महिला आयोगाच्या भूमिकेवर घेतली शंका

Share On

मुंबई – राष्ट्रवादीचे परळीचे (जि.बीड) उमेदवार धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंबाबत केलेल्या कथित वक्तव्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महिला आयोगाने धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने कारवाईचे संकेत दिले, त्यावर शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे.

धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा उल्लेख बहिणाबाई असा केला. या शब्दामध्ये काही चुकीचे नाही, असे सांगत पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडेंच्या या भाषणाची क्लीप व्हायरल झाल्यानंतर लगेचच याची नोंद घेऊन महिला आयोगाने धनंजय मुंडेंवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

महिला आयोगाचा हा ‘पक्षपातीपणा’

महिला आयोग हा कुठल्याही पक्षाचा नाही ही स्वतंत्र यंत्रणा आहे. मात्र, या आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपचा माणूस बसल्याने ते ‘पक्षपातीपणा’ करत असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल झालेली क्लीप आधी महिला आयोगाने काळजीपूर्वक तपासून योग्य पाऊल उचलण्याची गरज होती, मात्र तसे झालेले दिसत नसल्याचे मत पवारांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button