Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
मतदानादिवशी भरपगारी सुट्टी

- निवडणूक आयोगाचे आदेश : कामगार उपायुक्तांची माहिती
पुणे – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विविध खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत, असे कामगार उपायुक्त विकास पनवेलकर यांनी सांगितले.





