पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवेचा उद्या शुभारंभ

पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवेचा उद्या शुभारंभ

  • केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांचे उद्घाटन

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड दर्शन बस सेवेचा उद्या ( शनिवार दि. 3 ) दुपारी 3 वाजता निगडी येथील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल, भक्ती शक्ती चाैकात शुभारंभ होणार आहे, अशी माहिती महापाैर राहूल जाधव यांनी दिली.

या दर्शन बसचे उद्घाटन केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळ व शिरुरचे खासदार, तिन्ही आमदार, महानगरपलिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक – नगरसेविका, पुणे परिवहन महामंडाळाचे संचालक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपलिकेने शहर परिवर्तन कार्यलयाच्या अंतर्गत शहर परिवर्तन आराखडा तयार केला आहे. या धोरणाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड दर्शन बस सेवा नागरिकांसाठी सुरु करण्यात येत आहे. दर्शन बस सेवेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील व आसपासच्या परिसरामधील अनेक ऐतिहासिक स्थळांची ओळख पर्यटकांना आणि नागरिकांना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *