Breaking-newsपिंपरी / चिंचवड

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचा शासन आपल्या दारी उपक्रम

पिंपरी, (महाईन्यूज) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पिंपरी विधानसभा आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या सहकार्याने शासन आपल्या दारी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरांतर्गत संजय गांधी योजना, श्रवण बाळ योजना, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्तींसाठी योजना, इतर योजनेचा लाभ एकाच ठिकाणी व एका दिवशी मिळणार आहे. सर्व शासकीय अधिकारी याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. लाभार्थी असलेल्या व्यक्तींचे अर्ज लगेच मंजूर केले जाणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

शबिराची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी शिवसेना व युवासेना शाखा दापोडी -फुगेवाडी -कासारवाडी -बोपखेलमध्ये शिवसैनिकांनी व युवासैनिकांनी नागरिकांच्या घरी जाऊन यासंदर्भातील पत्रके वाटप केली. यावेळी माजी नगरसेवक संजय काटे, उपशहर प्रमुख तुषार नवले, युवानेते गोपाळ मोरे, रवी कोवे, विभागप्रमुख राजू सोलापुरे, चंद्रकांत शिंदे आदी उपस्थित होते.

या योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आव्हान युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले आणि विभागसंघटक निलेश हाके यांनी केले आहे. हा कार्यक्रम गुरुवारी (दि. 25 जुलै) विठ्ठल तरुण मंडळ वरची आळी दापोडी गावठाण येथील शासकीय रुग्णालय येथे होणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button