Breaking-newsपिंपरी / चिंचवड

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Share On

निगडी ( महा ई न्यूज ) – भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१६) रात्री पावणेनऊच्या सुमारास निगडी येथील पवळे उड्डाण पुलावर घडली.

सचिन बापु कडाळे (वय २७, रा. आंबेडकर वसाहत राहुलनगर सेक्टर क्र.२२, बिल्डिंग क्र. झेड ६ बी, रुम क्र.११, निगडी) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी दिपमाला दिपक चौरे (वय २९, रा. आंबेडकर वसाहत राहुलनगर सेक्टर क्र.२२, बिल्डिंग क्र. झेड ६ बी, रुम क्र.११, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास सचिन कडाळे हे त्यांच्या दुचाकीवरुन निगडी येथील पवळे उड्डाण पुलावरुन जात होते. यावेळी अज्ञात ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने चालवून सचिन याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत जखमी सचिन यांचा जागीच मृत्यू झाला. तर आरोपी ट्रकचालक फरार झाला. पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button