Breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका माध्यमिक शाळांमध्ये तासिक तत्वावर शिक्षक भरती

Share On

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या माध्यमिक विभागात मराठी माध्यमाचे 60 आणि उर्दू माध्यमांचे 18 अशा 78 शिक्षकांची मानधन तत्वावर भरती करण्यात आली आहे. त्या शिक्षकांना घड्याळी तासिका 85 रुपये तर मासिक साडेनऊ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षातील दहा महिन्यांसाठी शिक्षकांची नेमणूकीसाठी 74 लाख 10 हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेत शुक्रवारी मान्यता देण्यात आली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडेगिरी उपस्थित होते. महापालिकेच्या माध्यमिक विभागातील मराठीचे  18 विद्यालये आणि उर्दू  6 विद्यालये कार्यरत आहेत. या विद्यालयांमधून गतवर्षी 8,172 विद्यार्थी शिक्षण घेत होते. दहावीचा सरासरी निकाल, विद्यार्थ्यांना देण्यात आलेली बक्षिसे, नैसर्गिक वाढ या तत्वावर विद्यार्थी व तुकडी संख्येत वाढ होत आहे. सध्यस्थिती तुकडींच्या संख्येनुसार काही विषयांचे शिक्षक, सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती व रजा आदी कारणामुळे शिक्षकांची संख्या कमी झाली असून विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे.

शाळांच्या मुख्याध्यापकांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार महापालिका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारच्या निर्णयानुसार महापालिका विद्यालयात 54 रुपये तासिकेप्रमाणे दर आहे. गतवर्षी एकत्रित मानधनावर आठ हजार शिक्षकांची नेमणूक केली होती. तथापि, एकत्रित मानधनावर नियुक्ती केल्यास शिक्षक न्यायालयात याचिका दाखल करतात. त्यामुळे घड्याळी तासिकेवर शिक्षक नेमण्यात येणार आहेत. सरकारच्या निर्णयानुसार तासिका दर 54 रुपये असून त्यानुसार मासिक 5 ते 5500 हजार मानधन होते. यावर शिक्षक उपलब्ध होत नसल्याने महापालिका स्तरावर समिती गठित केली. पुणे महापालिकेत एकत्रित दहा हजार रुपये मानधन दिले जाते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button