पाणीकपात बंद करुन नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करा; नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची मागणी  

पाणीकपात बंद करुन नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करा; नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची मागणी  

पिंपरी, (महाईन्यूज) – धरणक्षेत्रामध्ये संततधार असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहराची पाणीकपात बंद करून शहरवासीयांना दररोज पाणी देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिली आहे.

यासंदर्भात भोंडवे यांनी आयुक्त हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या पवना धरणातील पाणीसाठा पाहता शहराला पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. दररोज पडणा-या पावसाने धरणातील साठ्यात वाढच होत आहे. ही बाब लक्षात घेता एक दिवसाआड असणारा पाणीपुरवठा बंद करुन दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा. अशी मागणी नगरसेवक भोंडवे यांनी निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *