Breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांचा मूळ अर्थसंकल्प महासभेत मांडणार; ‘स्थायी’च्या 267 कोटी उपसुचना निरस्त

Share On
– मुख्यलेखापाल आणि नगरसचिवांच्या चर्चेतून काढला मार्ग
पिंपरी ( महा ई न्युज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने 267.50 कोटी रुपयांच्या  उपसूचनांसह मंजुरी दिली. परंतू, प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी आज (शुक्रवार) झालेल्या स्थायी समितीने 267.50 कोटीच्या उपसुचना निरस्त केल्या. तसेच महापालिका आयुक्तांचा मुळ 4, 620 कोटी व केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6,183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती सभापती विलास मडेगिरी यांनी दिली.
लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या अगोदर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन 2019-20 या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पाला तत्कालिन स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांनी पावणेतीनशे कोटींच्या उपसूचनांसह मंजुरी दिली. 42 उपसूचनांद्वारे तब्बल 267.50 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात वाढ झाली होती. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प 6 हजार 450 कोटी रुपयांवर पोहचला होता.
महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोणतीही करवाढ आणि दरवाढ नसलेला सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता. त्यानंतर स्थायी समितीने दहा दिवसानंतर 42 उपसूचनांद्वारे तब्बल 267.50 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प 6 हजार 450 कोटी रुपयांवर पोहचला होता.

दरम्यान, महापालिकेच्या अर्थसंकल्पास उपसुचनांसह मंजुरी दिली. तरी देखील महासभेपुढे अर्थसंकल्प सादर झालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत आज (शुक्रवार) झालेल्या स्थायी समिती बैठकीत ऐनवेळी ठराव करुन अर्थसंकल्प दिलेल्या 42 उपसुनांद्वारे 267.50 कोटी रुपयांच्या उपसुचना निरस्त करण्यात आलेल्या आहेत. या उपसुचना निरस्त केल्याने महापालिकेच्या 2019-20 या आर्थिक वर्षाचा मुळ 4,620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत 6,183 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प अंतिम मान्यतेसाठी महासभेकडे शिफारस करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button