शरद पवार याचं मिशन विधानसभा, आमदारांची बोलविली बैठक

शरद पवार याचं मिशन विधानसभा, आमदारांची बोलविली बैठक

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी 4 मे रोजी मुंबईत पक्षाची बैठक बोलावली आहे.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपत नाही तोच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत पक्षाच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या या बैठकीला लोकसभा लढवलेल्या उमेदवारांना देखील बोलवण्यात आलं आहे. त्यामुळे यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत घडलेल्या घटनांचाही आढावा घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *