Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माझी लायकी काय ते निवडणुकीत दाखवतो, गोपीचंद पडळकरांचं संजय पाटलांना आव्हान

सांगली – माझी लायकी काढणारे सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील, मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. कुणाची किती लायकी आहे ती आत्ता कळेल. माझा पक्ष अजून निश्चित नाही, मात्र जो पक्ष देईल ती उमेदवारी, नाही तर अपक्ष, मात्र मी निवडणूक नक्की लढवणार आहे, असा निर्धार भाजपाचे नाराज नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे गोपीचंद पडळकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सांगलीचे भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर एका कार्यक्रमा दरम्यान पडळकर आणि संजय काका यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु होते. यावेळी खासदार संजय पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना आव्हान देत एवढा लायकीचा असशील तर निवडणुकीला उभा राहा, असं जाहीर आव्हान दिलं होतं. या मुद्द्याला धरून गोपीचंद पडळकर यांनी आपली भूमिका मांडली.

भाजपच्या नेत्यांना माझं आवाहन आहे की, भाजपची उमेदवारी संजय पाटील यांना जाहीर करा. लायकी कुणाची काय आहे हे जनता दाखवेल, असं सांगून पडळकर पुढे म्हणाले, खासदार संजय काका पाटील यांनी भाजपात राहून, पक्षाविषयी गद्दारी केली. तुम्ही संजय काका पाटील खासदार असताना सुद्धा, 2014 ला तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे हे 28 हजार मतांनी हरले कसे? तुमची त्याच वेळेला लायकी कळली होती, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group