पिंपळे गुरवमध्ये भर रस्त्यात विवाहित महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल

पिंपळे गुरवमध्ये भर रस्त्यात विवाहित महिलेचा विनयभंग, दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भर रस्त्यात एका विवाहितेचा दोघांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अमोल व अनिल बनसोडे (दोघे रा. जगताप वस्ती, पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गुरूवारी (दि. 17) रात्री नऊच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. कचरा टाकून घरी परतताना अमोल आणि अनिल दोघांनी पाठीमागून येऊन त्यांना रस्त्यात अडविले. त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याची तक्रार काल शुक्रवारी (दि. 18) दुपारी दीडच्या सुमारास नोंदविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *