Breaking-newsपिंपरी / चिंचवड

सहकारी बँकांचा शाखा विस्तार हे आर्थिक सुबत्तेचे लक्षण – आमदार लक्ष्मण जगताप

चिंचवड- एखाद्या भागात सहकारी बँकांचा शाखा विस्तार होणे, हे त्या परिसराच्या आर्थिक सुबत्तेचे व त्या परिसराच्या विकासाचे लक्षण असते. पिंपरी चिंचवडभागात उद्यम विकास सहकारी बँकेच्या अधिकाधिक शाखा व्हाव्यात यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे वचन भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिले.उद्यम बँक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील बँक असून संघ संस्कारित स्वयंसेवक संचालक असून ते बँक चालवत असल्याने त्यांची समाजात विश्वासार्हता असून तेसचोटीने व्यवहार करतील, अशी खात्री वाटते असेही आमदार जगताप म्हणाले.

चिंचवड, केशवनगर येथील काकडे पार्कमध्ये उद्यम बँकेच्या शाखेच्या स्थलांतर समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, संचालक महेश लडकत, दिलीप उंबरकर, पांडुरंग कुलकर्णी, मनोज नायर, सीताराम खाडे, राजन परदेशी, महेंद्र काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना बँकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी बँकेच्या प्रगतीचा आलेख मांडला. समाजातील सर्व स्तरांना कर्ज उपलब्ध करून देऊ, असे सांगितले. तसेच बँकेने १२५कोटींचा टप्पा गाठला असून ७७ कोटी कर्जवाटप केले आहे व सातत्यानेअ दर्जा मिळविला आहे असे ही ते म्हणाले. एटीएम, फ्रँकिंग, वीज बिल व एलआयसी प्रीमियम भरण्याचीसुविधा व सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, बँकेच्या दहा शाखांमधून दैनंदिन व्यवहार चालतात असे ही संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

सीताराम खाडे यांनी सूत्रसंचालन तर पांडुरंग कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button