Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलीकडे शरिर सुखाची मागणी करणारा तरुण अद्याप मोकाट

Share On

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि.१४) ते बुधवार (दि.१९) दरम्यान चाकण पोलीस ठाणे हद्दीतील गडद येथील घरात आणि राणात घडली.

याप्रकरणी पीडित १७ वर्षीय मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष रामभाऊ शिंदे (रा. गडद, ता. खेड, जि. पुणे) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही गडद येथे राहते. शुक्रवार ते बुधवार दरम्यान आरोपी संतोष शिंदे याने वेळोवेळी तिचा पाठलाग करुन रानात आणि तिच्या घरी जाऊन हात पकडत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. अश्लिलतेचा कळस म्हणजे आरोपी ने तिला निरोध दाखवून विनयभंग केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button