Breaking-newsमनोरंजन

आसामी चित्रपट ‘विलेज राॅकस्टार्स’ ऑस्कर शर्यतीतून बाहेर

ऑस्कर 2019 च्या सर्वश्रेष्ठ विदेशी भाषा चित्रपटाच्या श्रेणीमधून भारताकडून निवड करण्यात आलेला आसामी चित्रपट ‘विलेज राॅकस्टार्स’ शर्यतीतून बाहेर पडला आहे.

विलेज राॅकस्टार्सने याआधी राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये सुवर्ण कमळ देखील आपल्या नावावर केले आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे रिमा दास यांनी केले आहे. रिमा दास यांनी आसाम सरकारकडून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 3 कोटींची मागणी केली होती मात्रआ साम सरकारने त्यांना 1 कोटींची मदत केली. विलेज राॅकस्टार्सची टोरंटो फिल्म फेस्टिवलच्या प्रिमियरसाठी देखील निवड झाली होती.

विदेशी भाषा चित्रपटाच्या श्रेणीमध्ये आता बर्डस ऑफ पॅसेज (कोलंबिया), द गिल्टी (डेनमार्क), नेवर लुक अवे (जर्मनी ), शाॅपलिफ्टर्स (जापान ), आयका (कजाकिस्तान), कॅपरनाम (लेबनान), रोमा (मॅक्सिको), कोल्ड वार (पोलंड) आणि बर्निंग (साउथ कोरिया) या चित्रपटाची पुढील राउंडसाठी निवड झाली आहे.

याआधी भारताकडून मदर इंडिया (1958 ), सलाम बाॅम्बे (1989 ) आणि लगान (2001 ) हे चित्रपट आॅस्कर नामांकनामध्ये अंतिम पाचपर्यंत पोहचले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button