Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

बांगलादेश पुन्हा पेटला! शेख हसीना यांच्या परतीच्या घोषणेनंतर हिंसाचाराचा भडका; मोहम्मद युनूस यांचे घर जाळले

Bangladesh Violence | भारताच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराचा मोठा भडका उडाला आहे. गुरुवारी संतप्त आंदोलकांनी अनेक सरकारी कार्यालये, बाजारपेठा आणि वाहनांची तोडफोड केली असून, काही ठिकाणी भीषण स्फोटही घडवून आणले आहेत. इतकेच नव्हे तर नोबेल पुरस्कार विजेते आणि माजी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या वडिलोपार्जित घरालाही आग लावण्यात आली आहे. ऑगस्ट २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनानंतर पुन्हा एकदा बांगलादेशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या भारतात आश्रय घेतलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याचा इरादा जाहीर केला आहे. मायदेशी परतण्यासाठी त्यांनी नवीन पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्राची मागणी केली होती. मात्र, पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हसीना यांची ही मागणी फेटाळून लावली. त्याऐवजी भारतासोबतच्या प्रत्यार्पण करारानुसार शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात देण्यात यावे, अशी भूमिका सरकारने घेतली. या निर्णयानंतर हसीना यांच्या बंदी घातलेल्या ‘अवामी लीग’ पक्षाने आठवडाभर आंदोलनाची आणि गुरुवारी देशव्यापी बंदची हाक दिली, ज्याला हिंसक वळण लागले.

या हिंसाचाराची मोठी झळ मोहम्मद युनूस यांच्याशी संबंधित मालमत्तांना बसली आहे. बुधवारी रात्री चट्टोग्राम येथील युनूस यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावण्यात आली, तर गुरुवारी त्यांच्या राहत्या इमारतीच्या तळमजल्यावर ज्वलनशील पदार्थ फेकण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय, १० ते १९ नोव्हेंबर दरम्यान हल्लेखोरांनी युनूस यांनी स्थापन केलेल्या ‘ग्रामीण बँकेच्या’ ४० जिल्ह्यांतील किमान ७२ शाखांची जाळपोळ आणि तोडफोड केली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये १८ महिन्यांच्या अंतरिम सरकारनंतर युनूस यांनी तारिक रहमान यांच्याकडे सत्तेची सूत्रे सोपवली होती.

हेही वाचा

‘अक्वान’ चक्रीवादळ आज दुपारी ओडिशा-आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार! ३ लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर अन् ४१८ बचाव पथके तैनात

देशात अस्थिरता माजवण्याचे कटकारस्थान : पंतप्रधान तारिक रहमान

बांगलादेशातील या हिंसाचारावरून पंतप्रधान तारिक रहमान यांनी शेख हसीना यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला. भारताचे नाव घेणे टाळत ते म्हणाले की, “सीमापार आश्रय घेणाऱ्या हसीना तेथील जनतेला खूश करण्यासाठी बांगलादेशात हिंसाचार घडवून आणण्याचे कटकारस्थान रचत आहेत.”

प्रशासनाची कठोर कारवाई; १०७ जणांना अटक

बुधवारी रात्री सत्ताधारी पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सात जिल्ह्यांमध्ये बांगलादेश बॉर्डर गार्डच्या (BGB) ९७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, ढाका पोलिसांनी गेल्या २४ तासांत अवामी लीगशी संबंधित असल्याच्या संशयावरून माजी शिक्षणमंत्री नुरुल इस्लाम नाहिद यांच्यासह १०७ जणांना अटक केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group