कणेरीवाडीत क्‍लोरिन वायूची गळती, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

कणेरीवाडीत क्‍लोरिन वायूची गळती, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

कोल्‍हापूर – कनेरीवाडी, दत्तनगर येथील एमजेपीच्या जलशुध्दीकरण केंद्रात क्‍लोरिन वायूची गळती सुरू झाली आहे. यामुळे मदतकार्यासाठी नागरिकांनी अग्निशमन दलाची मदत मागितली आहे. अग्निशमन दलाकडून गळती रोखण्याचे शर्थीचे प्रयत्‍न सुरू आहेत. 

मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांच्याशी चर्चा सुरू झाली आहे. मदतकार्यासाठी रेस्क्यू टीम वाहनांसह घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनास्थळी लोकांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान वायू गळती रोखण्यासाठी काम करत आहेत. स्टेशन अधिकारी मनिष रणाभिसे स्वतः कृती पार पाडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *