महापालिकेच्या सावित्रीबाई फुले स्मारकातील प्रश्न सोडवा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारकात भव्य वाचनालय, सांस्कृतीक हॉलचे नामकरण, महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करणे, अशा अनेक मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने केल्या आहेत.
स्मारक समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यासह अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. सावित्रीबाई फुले स्मारकात भव्य वाचनालय सुरू करावे, फुले दांपत्यावर चित्रफीत तयार करावी, महिलांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करावी. स्मारकाच्या ठिकाणी सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, साहित्य ठेवण्यासाठी स्मारकाच्या ठिकाणी स्वतंत्र रूम तयार करावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, विद्युत रोषणाई करावी, कारंजे सुरू करावेत, पुतळ्यास मेघडंबरी व हार घालण्यासाठी जीना करावा.
पुतळा परिसरात फुले दांपत्यांवर म्युरल्स बनवावे, चौकात दिशा दर्शक फलक बसवावेत, स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यासिका करावी, ग्रंथालयासाठी पुस्तक खऱेदी करावी, अशा अनेक मागण्या समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. बैठकीत मानव कांबळे, वैजीनाथ शिरसाट, बन्सी पारडे, नंदा करे, आनंदा कुदळे, अॅड. रविंद्र कुदळे, हनुमंत राऊत, विश्वास राऊत, गिरीश गायकवाड, निरज कडू, गुलाब पानपाटील, विठ्ठल झेंडें, सुरेश गायकवाड, निरज कडू आदी पदाधिकारी, तर प्रशासकीय अधिका-यांमध्ये आशादेवी दुरगुडे, लक्ष्मीकांत कोल्हे, प्रभावती गाडेकर, महादेव शिंदे, आर. एम. पवार हे देखील उपस्थित होते.





