Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईच्या मध्य आणि ट्रान्स हार्बरवर आज मेगाब्लॉक

Share On

मुंबईच्या मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गांवर आज (रविवारी) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल गाड्या दिवा ते परेल स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर या लोकल परेल स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे पुन्हा जलद मार्गावरून धावतील. रविवारी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

अप जलद मार्गावरील लोकल सकाळी १०.३७ ते दुपारी ३.०६ वा. या वेळेत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला, तर डाऊन जलद मार्गावरील जलद तसेच अर्धजलद लोकल या स. १०.०५ ते दु.३.२२ वा. या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांत थांबतील. रविवारी ठाणे ते वाशी ट्रान्स हर्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला असून अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत वाहतूक बंद राहणार असून प्रवाशांना हार्बर तसेच मुख्य मार्गिकेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button